एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.

0
216

माणदेश एक्सप्रेस न्यूज : पाकिस्तानला पुन्हा एकदा तोंडावर पाडण्यात भारताला यश आलेलं आहे. पाकिस्तानकडून अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर आता भारत वॉटर स्ट्राईक करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. भारताने बगलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत. यातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे किनारपट्टी भगत पुरपरिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानात देखील यामुळे पुर येणार आहे. आधी हवाई हल्ला आणि आता वॉटर स्ट्राईक भारताकडून केला जाणार आहे.

 

जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. मात्र आता सिंधु जल करार भारताने रद्द केलेला असल्याने भारत पाकिस्तानला याबद्दल कोणतीही माहिती देण्यास बांधील नाही. त्याचमुळे भारताने कोणती पूर्वसूचना न देता बगलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here