मटार पुलाव ते मसाले भात अशा विविध १५ पदार्थांचा राज्याच्या शालेय पोषण आहारात होणार समावेश

0
27

विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात वैविध्यता आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील या दृष्टीने तीन संरचित आहार पध्दतीमध्ये तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व यांचा समावेश करुन नविन पाककृती निश्चित करण्यात आली आहे.

पुढील 15 पदार्थांचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यात आला आहे-
1. व्हेजिटेबल पुलाव
2. मसाले भात
3. मटार पुलाव
4. मूगडाळ खिचडी
5. चवळी खिचडी
6. चना पुलाव
7. सोयाबीन पुलाव
8. मसुरी पुलाव
9. अंडा पुलाव,
10. मोड आलेल्या मटकींची उसळ
11. गोड खिचडी
12. मूग शेवगा वरण-भात
13. तांदळाची खीर
14. नाचणीचे सत्त्व
15. मोड आलेले कडधान्य

जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी अथवा स्थानिक फळ दिले जाणार आहे. बचत गटाचे आहार तयार करण्याचे दर निश्चित केले आहेत. राज्य शासनाच्या सुधारित आदेशानुसार अंमलबजावणी केली जाईल. राज्य शासनाने शालेय पोषण आहारासाठी शाळांना सुचवलेल्या पदार्थांची. केवळ खिचडी, वरण-भात, उसळ भात अशा मर्यादित खाद्यापदार्थांऐवजी यंदापासून 15 लज्जतदार पदार्थांची चव पोषण आहार योजनेत पात्र असल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या 86 हजार 500 शाळांमधील 1 कोटी 3 लाख विद्यार्थ्यांना चाखता येणार असल्याने त्यांची ज्ञानाच्या जोडीनेच अन्नाची गोडी वाढणार आहे.

15 जूनपासून ‘एक राज्य एक गणवेश’-
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा (Marathi School Uniform News) लाभ देण्यात येतो. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश (One State One Uniform) उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश धारण करणे आवश्यक राहील. तसेच स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी सदर गणवेश परिधान करावा. स्काऊट व गाईड विषयाचा गणवेश असलेल्या दिवशी (मंगळवार, गुरुवार, शनिवार) स्काऊट व गाईड विषयाच्या तासिका ठेवण्यात येणार आहेत.