कवठेमहांकाळ तालुक्यातील कुचीजवळ भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, ११ जण जखमी

0
502

माणदेश एक्स्प्रेस/कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे टॅम्पो व ट्रकच्या भीषण अपघातात मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील मजुरीसाठी गेलेल्या रेखा कांबळे (४२) रा.म्हैसाळ या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर अन्य अकरा जखमीवर मिरज येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील राणी वडर (४३),भारती कांबळे(२३),कांचन कांबळे(६०) सर्व रा.म्हैसाळ या महिला गंभीर जखमी आहेत. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुची येथे हा अपघात झाला.

 

 

अपघातातील जखमींमध्ये मंगल बेरड (४२), वनिता माने(४०), मंगल आवळे(४०), पार्वती कांबळे(६०), अप्पा वाघमारे(५३), कबीर कांबळे(३९), राणी वडर(३८), श्रेयांश माने(९) यांचा समावेश आहे.

 

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील या सर्व महिला खरडी जि.सोलापूर येथे द्राक्ष काढण्यासाठी टेम्पोने सकाळी गेल्या होत्या. दिवसभर काम करून सायंकाळी घरी परतत असताना कुची कवठेमहांकाळ येथे (KA22AA 4770) या टेम्पोला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. इतर सर्व जखमीवर उपचार सुरू आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here