मुंबईत पत्नीच्या त्रासाला कंटाळून पोलीस हवालदाराची आत्महत्या

0
9

मुंबईतील एका 38 वर्षीय पोलीस हवालदाराने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, कॉन्स्टेबलने एक सुसाईड नोटही लिहिली असून, त्यात त्याने पत्नीचा छळ केल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहू नगर पोलिस ठाण्यात तैनात असलेले कॉन्स्टेबल विजय साळुंखे यांनी शुक्रवारी रात्री प्रतीक्षा नगर पोलिस क्वार्टरमध्ये असलेल्या राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

वडाळा टीटी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कॉन्स्टेबल साळुंखे यांनी आत्महत्या केली तेव्हा ते घरात एकटेच होते. त्यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंबीय घरी आले असता त्यांना साळुंखे लटकलेल्या अवस्थेत दिसले.

त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. या अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली असून, त्यात साळुंखे यांनी पत्नीचा छळ केल्याचा आरोप केला आहे.
साळुंखे दाम्पत्याला एक मुलगी आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून अपघाती मृत्यू दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here