पती सोबतच्या भांडणातून आईने 4 वर्षाच्या मुलीची केली हत्या, त्यानंतर स्वत: केली आत्महत्या

0
67

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू येथून धक्कादायक उघडकीस आली आहे. 23 वर्षीय आदिवासी महिलेने चार वर्षाच्या मुलीची हत्या केली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू परिसरातील सिसणे गावात ही घटना घडली. सोमवारी 8 जुलै रोजी ही घटना घडली. या घटनेत पोलिसांनी सांगितले की, आदिवासी महिलेचा पती हा मच्छीमार आहे. तो कामानिमित्त घराबाहेर असायचा. रविवारी तो घरी परतला आणि मित्रांसोबत बाहेर गेला त्यावेळी त्याने पत्नीने सोबत घेऊन जाण्यास विनंती केली परंतु त्याने नकार दिला. त्याने तिला सोबत न घेऊन गेल्याने त्याची पत्नी नाराज झाली. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले.

या गोष्टीचा राग महिलेने मनात धरला. घरात कुणी नसताना महिलेने तिच्या मुलीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या घराच्या छताला गळफास लावून घेतला. महिला बराच वेळ बाहेर आली नाही त्यामुळे शेजरच्यांनी घरात पाहिले तर महिला छताला लटकून होती. शेजारच्यांनी या घटनेची माहिती तिच्या पतीला आणि पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी पोलिस पुढील चौकशी करत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here