दिल्ली पोलिसांना इसिसच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला पकडण्यात मोठे यश

0
107

दिल्ली पोलिसांना इसिसच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला पकडण्यात मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी इसिसचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल याला अटक केली आहे. रिझवान हा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मोस्ट वाँटेड यादीत होता. रिझवानवरती तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले होते. रिझवान हा पुणे ISIS मॉड्यूलशी संबंधित होता. आयएसआयएसशी संबंधित दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल रिझवानवरती तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

पुणे आयएसआयएस मॉड्यूलमध्ये मुख्य भूमिकेसाठी रिझवानवर अधिकाऱ्यांनी 3 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. याशिवाय अन्य दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग तपासला जात आहे.

आज(शुक्रवारी) पहाटे दिल्ली-फरिदाबाद सीमेवरून रिझवानला शस्त्रास्त्रांसह पकडण्यात आल्याची माहिती आहे. UAPA अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून रिझवानचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. रिझवान आणि अन्य दोन दहशतवादी मोस्ट वॉन्टेड यादीत होते. त्यापैकी एक शाहनवाज याला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती, तर अब्दुल्ला उर्फ डायपरवाला अद्याप फरार आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला 15 ऑगस्टपूर्वी मोठे यश
दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलला 15 ऑगस्टपूर्वी मोठे यश मिळालं आहे. दिल्ली पोलिसांनी ISIS मॉड्यूलच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. रिझवान असे या दहशतवाद्याचे नाव आहे. रिझवान हा दिल्लीतील दर्यागंजचा रहिवासी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रिझवान हा पुणे ISIS च्या मॉड्यूलशी संबंधित आहे. रिझवानच्या अटकेसाठी एनआयएने वॉरंट जारी केले होते. पुणे पोलिसांच्या (Pune Police) तावडीतून तो पळून गेल्यापासून तो लपलेला होता. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शुक्रवारी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत रिझवानचा होता समावेश
एनआयएच्या (NIA) मोस्ट वाँटेड यादीत दहशतवादी रिजवान अलीचा समावेश होता. पुणे ISIS मॉड्यूलच्या अनेक सदस्यांना पुणे पोलिस आणि NIA ने यापूर्वी अटक केली होती. या वर्षी मार्चमध्ये दहशतवाद विरोधी एजन्सीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात रिझवानच्या नावासह अन्य तीन आरोपींचाही समावेश होता. एनआयएने पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात एकूण 11 आरोपींवर आरोप ठेवले आहेत. हे प्रकरण पुण्यातील महाराष्ट्रातील ISIS शी संबंधित शस्त्रे, स्फोटके, रसायने आणि साहित्य जप्त करण्याशी संबंधित आहे.

पहा पोस्ट:

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here