चार जोडप्यांची प्रेमकहाणी अन् अरिजीतच्या आवाजाची जादू; “या” चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

0
64

अनुराग बसु दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘मेट्रो इन दिनो’ (Metro In Dino) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मुंबई शहरात आजूबाजूला घडणाऱ्या चार जोडप्यांची ही कहाणी आहे. याआधीही २००७ साली आलेला ‘लाईफ इन अ मेट्रो’ खूप गाजला होता. त्यातही चार जोडप्यांची कहाणी होती. आता ‘मेट्रो इन दिनो’त्याचाच पुढचा भाग आहे. ट्रेलरमधून एकूणच सिनेमाचा अंदाज येत आहे. तसंच अरिजीत सिंगच्या आवाजाने पुन्हा सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे.

 

‘मेट्रो…इन दिनो’मध्ये आदित्य रॉय कपूर-सारा अली खान, अनुपम खेर-नीना गुप्ता, अली फजल-फातिमा सना शेख आणि पंकज त्रिपाठी-कोंकणा सेन शर्मा अशा इंटरेस्टिंग जोड्या आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यातली वेगवेगळ्या वयोगटातली ही प्रेम कहाणी आहे. ज्यात विरहाचं दु:खही आहे. मध्येच हसवणारीही ही कहाणी आहे. ट्रेलरमध्ये याचीच झलक पाहायला मिळते. तसंच बॅकग्राऊंडला अरिजीत सिंगचा आवाज पुन्हा प्रेमात पाडणारा आहे. ३ मिनिट १७ सेकंदांच्या या ट्रेलरने प्रेक्षकांना नक्कीच प्रभावित केलं आहे.

 

‘मेट्रो इन दिनो’ येत्या ४ जुलै रोजी रिलीज होत आहे. भूषण कुमार यांच्या टीसीरिजने सिनेमाची निर्मिती केली आहे. संगीतकार प्रीतमने सिनेमात संगीत दिग्दर्शन केलं आहे. ट्रेलरवर अनेकांनी कमेंट करत अरिजीतच्या आवाजाचं कौतुक केलं आहे. सारा आणि आदित्यची फ्रेश जोडी पाहण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here