डुकराची शिकार करण्यासाठी सिंहीण अक्षरश: बिळात घुसली; डुकराचा लढा पाहून पिल्लंही रडू लागली; आवाज ऐकून मन हेलावून जाईल

0
424

Shocking video: सिंह हा जंगलाचा राजा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच तो जंगलातील सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी देखील त्याच्यापासून लांबच राहातात. एका सिंहीणीने एका जंगली डुकराची शिकार करण्याचा प्रयत्न केला. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. अगदी बिबट्या सुद्धा. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओध्या समोर आला आहे. जंगलात शिकार करताना अनेकद प्राण्यांची फसगत होते. पण त्यानंतर जे घडतं ते अनेकदा पाहणं आश्चर्यकारक असतं.

 

 

डुक्कर सिंहीणीला पाहून आपल्या बिळात लपला. पण विशेष बाब म्हणजे सिंहीणीने अक्षरशः त्या बिळात घुसून त्याला बाहेर ओढून काढलं. आता या हल्ल्याचा व्हायरल व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. सिंह बिळात घुसला पण तरी डुक्करानं शेवटपर्यंत लढा दिला. त्याने सिंहीणीला जोरदार प्रतिकार दिला. काही वेळ दोघांमध्ये जबरदस्त झटापट झाली. पण शेवटी तेच झालं, ज्याची सगळ्यांना अपेक्षा होती सिंहीणीने काही मिनिटांत डुकराचा काम तमाम केलं. मात्र डुकराला पाहून बिळात असलेली पिल्लं मात्र ओरडत होती रडत होती. या पिल्लांच्या रडण्याचा आवाज ऐकून तुमचंही मन हेलावून जाईल.

 

 

या व्हिडीओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी स्माईली इमोजी सेंड करुन मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओला हजारो लाइक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “प्राण्यांची खरी लढाई! तर आणखी एकानं, तो घाबरला आहे पण त्याने भीतीपोटी विरोध करण्याचे धाडस केले. त्यामुळे कदाचित तो वाचला असेल. अशी प्रतिक्रिया दिली आहे.भीती वाटणे साहजिक आहे पण भीतीपोटी लढणे थांबवणे चूकीचे आहे. तर अनेकांनी सिंहीणीला घाबरट म्हटले तर अनेकांनी डुकराच्या हिमतीला दाद दिली.

 

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here