लढाई अस्तित्वाची! जेव्हा दोन वाघ समोरा-समोर येतात तेव्हा काय घडतं? पर्यटकांनीच रेकॉर्ड केला थरारक प्रकार

0
97

डोळ्यांसमोर चुकूनही वाघ दिसला किंवा त्याच्या डरकाळीचा आवाज कानावर पडला तरी छातीत धडकी भरते. त्यामुळे कित्येक डॅशिंग व्यक्तीमत्वाची तुलना थेट वाघाशी केली जाते. तरीही जंगलातला वाघ हा वाघच असतो. अशाच दोन वाघांच्या लढाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जंगलाचा राजा वाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघच्या नादाला कुणी लागत नाही. पण तुम्ही कधी एका वाघाची दुसऱ्या वाघासोबत झालेली लढत पाहिली आहे का. होय, असाच काहीसा प्रकार घडला आहे. दोन वाघांमध्ये जीवघेणी लढाई झाली. दोघांनीही एकमेकांवर जोरदार हल्ले-प्रतिहल्ले केले. शेवटी या युद्धात कोण जिंकलं हे आता तुम्हीच पाहा.

 

तर त्याचं झालं असं की, मध्य प्रदेशच्या कान्हा रिझर्वमध्ये सफारीचा आनंद घेत असलेल्या एका पर्यटकानं हा अद्भुत नजारा पाहिला. ज्यात दोन वाघांची तूफान फाइट सुरू आहे. २६ सेकंदाची ही क्लिप रवींद्र मणि त्रिपाठी यानी एक्स अकाऊंटवर पोस्ट करण्यात आली आहे. ते कान्हा रिझर्वचे फीलड डायरेक्टर आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनला त्यानी लिहिलं की, ‘पर्यटकानं राष्ट्रीय उद्यानात आपल्या सफारी दरम्यान वाघांच्या जोरदार भांडणाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

 

 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दोन वाघ एकमेकांना भिडताना दिसत आहेत. पहिला वाघ दुसऱ्या वाघावर आक्रमण करतो, तर दुसरा वाघही मागे हटत नाही. दोघांमध्ये झटापट होते. त्यानंतर एक वाघ जमिनीवर पडतो. वाघांच्या या कुस्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोन वाघांमध्ये अतिशय कडवी झुंज लागली आहे. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी. अन्यथा तुमची काही खैर नाही.