पंचतारांकित हॉटेलमधील सांबरात सापडले मेलेले झुरळ; स्वयंपाकघर ४८ तासांसाठी सील

0
198

बुधवारी सकाळी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या सांबरात मृत झुरळ आढळून आले, त्यानंतर स्थानिक नागरी संस्थेने त्याचे स्वयंपाकघर ४८ तासांसाठी सील केले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अहमदाबाद महानगरपालिकेचे अन्न विभागाचे अधिकारी भावीन जोशी यांनी सांगितले की, वस्त्रापूर परिसरात असलेल्या हॉटेल ‘हयात अहमदाबाद’मध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान एका पाहुण्याला सांबरामध्ये झुरळ दिसले आणि त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवला. या व्यक्तीने याचा व्हिडीओ बनवून आमच्या पोर्टलवर रीतसर तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले, चौकशीनंतर हॉटेलचे किचन ४८ तासांसाठी सील करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here