माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उभे होते. उभे असलेल्या 12 उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्याचं प्रथमदर्शन दिसून येत आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भाजप महायुतीचा वरचष्मा दिसून आला.
विधानपरिषदेच्या 11 विजयी उमेदवारांची यादी
भाजपचे विजयी उमदेवार
1.योगेश टिळेकर
2.पंकजा मुंडे
3.परिणय फुके
4.अमित गोरखे
5.सदाभाऊ खोत
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार
6.भावना गवळी
7.कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
8.राजेश विटेकर
9.शिवाजीराव गर्जे
काँग्रेस विजयी उमेदवार
10.प्रज्ञा सातव –
शिवसेना ठाकरे गट
11.मिलिंद नार्वेकर
भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडत होती. मात्र, त्यांच्या उमेदवारांना ती मतं मिळाली असून भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. शिंदेसेनेचे दोन उमेदवार रिंगणात होते. त्यांचे 39 आमदार असून त्यांना 10 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने तेही सुस्थितीत होते, त्यांचेही दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वतःच्या पक्षाचा एकच आमदार होता. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने त्यांचे 15 आमदार सभागृहात होते. त्यामुळे, जयंत पाटील यांच्याकडे 16 मते होती. जयंत पाटील यांना विजयासाठी आणखी 7 मतांची जुळवाजुळव करावी लागणार होती. पण, त्यांना 7 मतांची जुळवाजुळव करणे शक्य झालं नसल्याचं दिसून आले.
हे ही वाचा :- आटपाडीच्या शिरेपेचात मानाचा तुरा ; “यांचे” सीए परीक्षेत यश