चहाची गाळण स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘ही’ भन्नाट ट्रिक

0
1547

 

स्वयंपाक करताना जितकी चव महत्त्वाची असते तितकीच स्वच्छता देखील महत्त्वाची असते. ही स्वच्छता ओट्याची असो किंवा भांड्याची. स्वयंपाक करताना वापरली जाणारी अशी अनेक भांडी आहे जी घासताना खूप त्रास होतो. जसे की, मिक्सरचे भांडे, कुकरचे झाकण असो किंवा चहाची गाळणी. मिक्सरचे भांडे, कुकरचे झाकण भांडी कितीही साफ केली तर कुठे ना कुठे काही ना काही अन्नाचे कन्न मागे राहतात आणि चहाची गाळणी तर इतकी खराब होऊन जाते की त्यातून चहाच गाळता येत नाही.

तुम्ही जर घरात रोज चहा बनवत असाल तर तुम्हाला हे कदाचित माहित असेल की, चहाची गाळण साफ करण्यासाठी अनेकदा चहाची गाळण गॅसवर ठेवून जाळली जाते. जेणेकरून गाळणीमध्ये अडकलेली चहापावडर जळून जाईल आणि गाळणीचे छिद्र मोकळे होतील. पण त्यामुळे चहाची गाळण देखील काळी पडू लागते आणि गाळण खराब होते. त्यामुळे वारंवार चहाची गाळण बदलावी लागते. तुम्हाला ही पद्धत आवडत नसेल तर चहाची गाळण साफ करण्याच्या इतर पद्धत वापरू शकता. चहाची गाळण गॅसवर न जाळता साफ करण्याची पद्धत जाणून घ्या….

चहाची गाळण साफ करण्याची भन्नाट ट्रिक
सर्व प्रथम गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करा. पाणी गरम झालं की, त्यामध्ये भांडे घासण्याचे लिक्वीड टाका.
त्यात बेकिंग सोडा टाका आणि लिंबाचा रस टाका. एक मिनिटे पाणी उकळून घ्या.
त्यात चहाची गाळण काही वेळ ठेवा.
त्यानंतर टुथपेस्ट वापरून चहाची गाळण ब्रशने घासून घ्या.
चहाची गाळणीचे कोणतेही नुकसान न होता एकदम नव्यासारखी साफ होईल.
इंस्टाग्रामवर simply.marath नावाच्या पेजवर ही भन्नाट ट्रिक सांगितली आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करून ही ट्रिक सांगितल्या बद्दल आभार व्यक्त केले. एकाने लिहिले, चहाची गाळणी साफ करण्याची खूर चांगली ट्रिक आहे.

तुम्ही स्वत: ही ट्रिक वापरून पाहा आणि ठरवा ही उपयूक्त आहे की नाही.