सोशल मीडिया वापरताना भारतात ‘या’ इमोजींचा होतो सर्वाधिक वापर

0
41

सोशल मीडियाचा वापर हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. सोशल नेटवर्कींगच्या साह्याने एकमेकांशी कनेक्ट राहण्याचा ट्रेंड सध्या जागतिक स्तरावर वाढलेला दिसतो. यामध्ये व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारखी अॅप्लिकेशन आणि हँडल्स आघाडीवर असल्याचे आपल्याला दिसते. दैनंदिन जीवनाचा वाढता वेग पाहता सोशल मीडिया हे संवादाचे उत्तम माध्यम असल्याचे अनेकांना वाटते. आता यावरुन संवाद साधणे म्हणजे एकमेकांशी भाषेचा वापर करुन बोलणे असे होय. मात्र आता भाषेच्या वापराबरोबरच जगभरात सोशल मीडियावरील इमोजीचा वापर वाढला आहे.

जर्मी बर्ग यांनी १७ जुलै २०१४ रोजी इमोजीपिडियाची सुरुवात केली. त्यानंतर विविध ठिकाणी या इमोजींचा वापर सुरु झाला. मात्र हा दिवस इमोजीच्या वापरानंतर एक वर्षाने साजरा करण्यास सुरुवात झाली. सध्या एकूण २८०० इमोजी आहेत. त्यातील २३०० इमोजी फेसबुकवर रोज वापरल्या जात असल्याचे या आकडेवारीवरुन समोर आले आहे. तर फेसबुक मेसेंजरवरुन रोज ९० कोटींहून जास्त इमोजी एका दिवसांत पाठवल्या जातात. यातही कोणत्या देशात कोणती इमोजी जास्त वापरली जाते याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जोरात हसण्याची इमोजी अमेरिका, युके, थायलंड, फिलिपिन्स, मेक्सिको, इंडोनेशिया या देशांमध्ये वापरली जाते. तर केकची इमोजी भारताबरोबर स्विडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जर्मनीत सर्वाधिक वापरली जाते.

भारतात ट्विटरवर जोरात हसणारी आणि त्यामुळे डोळ्यातून पाणी येणारी इमोजी सर्वाधिक वापरली जाते. तसेच डोळ्यात हार्ट असलेली इमोजीही जास्त प्रमाणात वापरली जाते. त्याबरोबरच नमस्कार करणारी म्हणजेच प्रार्थना करणारी इमोजीही भारतात जास्त वापरली जाते. मात्र या इमोजीचा अर्थ हायफाय किंवा एकमेकांना टाळी देणे असा आहे. भारतात अशा अनेक इमोजीज चुकीच्या अर्थाने वापरल्या जातात. आपण कमेंट करायची नसल्यास तोंडावर पांढरी पट्टी असल्याचे इमोजी वापरतो मात्र हे इमोजी रुग्णालयाशी संबंधित वापरण्यासाठी आहे. एखाद्या गोष्टींचे कारण विचारण्यासाठीही आपण एक इमोजी वापरतो. ते इमोजी कारण विचारण्यासाठी नसून विचार करण्यासाठी आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here