29 वर्षीय भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी भगवद्गीतावर घेतली खासदारकीची शपथ

0
56

ब्रिटीश पार्लमेंट मध्ये 29 वर्षीय भारतीय वंशाच्या खासदार Shivani Raja यांनी भगवद्गीतावर खासदारकीची शपथ घेतली आहे. सध्या शिवानी राजा (Shivani Raja) यांचा हा शपथविधीचा व्हिडिओ सोशल मीडीयात झपाट्याने शेअर केला जात आहे. शिवानी या गुजराती बिझनेसवूमन आहेत. नुकत्याच झालेल्या यूके मधील निवडणूकीत त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Leicester East seat त्यांनी Conservative Party ला मिळवून दिली आहे. या जागेवर 37 वर्ष Labour Party चं वर्चस्व होतं. दरम्यान शिवानी विरूद्ध या जागेवरूनच निवडणूकीच्या रिंगणात Labour Party कडून भारतीय वंशाचे Rajesh Agrawal होते.

शिवानी राजा यांनी शपथविधी नंतर इंस्टाग्रामवर त्यांचा व्हिडिओ अपलोड करत ‘Leicester East चं संसदेमध्ये प्रतिनिधित्व करणं ही प्रतिष्ठेची बाब आहे. गीतेवर शपथ घेताना मला अभिमान वाटतो’ असंही त्यांनी कॅप्शन मध्ये म्हटलं आहे.

शिवानी राजा यांचा विजय ऐतिहासिक असण्यामागील कारणं!
2022 मध्ये, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 आशिया कप सामन्यानंतर लेस्टर शहरात भारतीय वंशाच्या हिंदू समुदाय आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष झाला होता. हे लक्षात घेता शिवानीचा विजय महत्त्वाचा आहे. शिवानी यांनी 14,526 मते मिळवत लंडनचे माजी उपमहापौर अग्रवाल यांचा पराभव केला आहे.

लीसेस्टर पूर्व हा 1987 पासून लेबर पार्टीचा बालेकिल्ला आहे. शिवानी व्यतिरिक्त, युनायटेड किंगडममध्ये 4 जुलै रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 27 भारतीय वंशाचे खासदार हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून आले आहेत.

शिवानी राजा कोण आहेत?
शिवानी राजा या गुजराती आहेत. त्यांनी ब्रिटीश पार्लमेंटच्या निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय ब्रिटीश मतदारांसोबत वेळ घालवला आहे. त्यांचा जन्म युके च्या Leicester मध्ये झाला आहे. युके मध्येच Herrick Primary, Soar Valley College, Wigston, आणि Queen Elizabeth II College मध्ये त्यांचे शिक्षण झाले आहे. शिवानी यांची आई राजकोट मधून युकेत आली आहे तर वडील गुजराती आहेत मात्र 1970 मध्ये ते केनिया मधून यूकेत आले.

शिवानी राजा यांनी लंडनचे माजी उपमहापौर राजेश अग्रवाल यांना 10,100 मतांसह पराभूत केले आहे. लेस्टर ईस्ट 1987 पासून लेबर पार्टीकडे होते.

पहा व्हिडीओ:

instagram.com/reel/C9PuZFisFsf

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here