भारतीय हवाई दलात (IAF) अग्निवीर वायू ०२/२०२५ च्या भरतीसाठी ८ जुलै २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच काल सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. अग्निवीर म्हणून हवाई दलात सामील होण्यास इच्छुक असलेले पात्र उमेदवार agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन २८ जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. भरतीसाठी कोण अर्ज करू शकते? लेखी परीक्षा कधी होईल, अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
IAF अग्निवीर वायुदलाततील या भरतीसाठी पुरुष व महिला असे दोन्ही उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. पण, ही बाब लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, केवळ अविवाहित उमेदवारच भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतात.
IAF Agniveervayu Recruitment 2024 : वयोमर्यादा –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म ३ जुलै २००४ ते ३ जानेवारी २००८ दरम्यान झालेला असावा. (नावनोंदणीच्या तारखेला उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त नसावे).
IAF Agniveervayu Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता –
अर्ज करणारा उमेदवार भौतिकशास्त्र, गणित व इंग्रजी विषयातून बारावी उत्तीर्ण असावा आणि परीक्षेत तो ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराने कमीत कमी अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.
IAF Agniveervayu Recruitment 2024 : लेखी परीक्षा –
अग्निवर वायुदल भरती २०२४ साठी लेखी परीक्षा १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
ही भरती अग्निवीर वायुदल योजनेंतर्गत होत असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षे सेवा करण्याची संधी मिळेल. चार वर्षांनुसारचा पगार उमेदवारांनी अधिसूचनेत तपासून घ्यावा.
अधिसूचना लिंक : https://agnipathvayu.cdac.in/AV/img/upcoming/AGNIVEER_VAYU_02-2025.pdf
उमेदवाराने अधिसूचना काळजीपूर्वक वाचून, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे.