आजकालच्या धकाधकीच्या जीवनात विविध प्रकारचे आजार डोकं वर काढत आहेत. बदलती जीवनशैली, जंकफूडचे सेवन, व्यायामाचा अभाव, अपूर्ण झोपेच्या अभावी अनेक लोक विविध आजारांच्या विळख्यात सापडले आहेत. अशात लहानांपासून मोठ्यांना अशा अनेकांना मधुमेहाचा धोका असतो, हा आजार प्रामुख्याने शरीरातील साखरेची पातळी वाढल्यानंतर किंवा अनुवांशिकपणाने होण्याची शक्यता असते. मात्र प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे मधुमेह झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? हो हे खरंय.. कारण एका अभ्यासानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर मधुमेहाचा धोका वाढवू शकतो. अभ्यास काय म्हणतो? सविस्तर जाणून घेऊया…
अनेकदा पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर
आजकाल प्लास्टिकचा वापर अनेक प्रकारे केला जातो. प्लास्टिक हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. प्लास्टिकचा वापर आपण अनेक प्रकारे करतो. विशेषतः ते बाटलीच्या स्वरूपात सर्वाधिक वापरले जाते. आजकाल लोक अनेकदा पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतात, परंतु प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिल्याने खूप नुकसान होते. यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. दरम्यान, याबाबत आता धक्कादायक अभ्यास समोर आला आहे.
अभ्यास काय सांगतो?
अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की प्लास्टिकमध्ये वापरल्या जाणाऱ्या बीपीएमुळे (BPA) इंसुलिनची संवेदनशीलता कमी होते, ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. BPA हे अन्न आणि पेयांच्या पॅकेजिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ज्यामुळे मधुमेहाची शक्यता वाढते. ज्यामुळे रक्तातील साखरेची तीव्रता वाढू शकते, हा टाईप 2 मधुमेहासाठी एक प्रमुख जोखीम घटक आहे.
अशा प्रकारे मधुमेहाचा धोका कमी करा
सध्या, FDA द्वारे अन्न कंटेनरमध्ये 5 mg पर्यंत BPA सुरक्षित मानले जाते. तर, नवीन अभ्यासात हे प्रमाण धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. अभ्यासानुसार हे प्रमाण 100 पट अधिक आहे, संशोधकांनी अन्न आणि पेयांच्या संपर्कात येणाऱ्या उत्पादनांमध्ये बीपीएवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. स्टेनलेस स्टील किंवा काचेच्या बाटल्या, तसेच बीपीए-मुक्त कंटेनर वापरून बीपीए एक्सपोजर कमी केल्याने मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो, असा या अभ्यासात निष्कर्ष आहे.
BPA म्हणजे काय?
BPA किंवा Bisphenol-A हे प्लॅस्टिक बनवण्यासाठी वापरले जाणारे औद्योगिक रसायन आहे. ते खाद्यपदार्थ, बाळाच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांसह अनेक व्यावसायिक उत्पादनांमध्ये वापरले जाते.
बीपीए सुरक्षित पातळी काय आहे?
यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA) च्या 2014 च्या अहवालानुसार, शरीराच्या वजनाच्या प्रति पौंड 2.25 मिलीग्रामपेक्षा कमी किंवा दररोज 5 मिलीग्राम प्रति किलोग्राम बीपीए सुरक्षित आहे.
सुरक्षित बीपीए पातळी कशी ओळखावी?
जर तुम्हाला प्लास्टिकच्या कंटेनर किंवा बाटलीमध्ये सुरक्षित बीपीए पातळी ओळखायची असेल, तर लक्षात ठेवण्यासाठी काही संख्या आहेत. 1, 2, 4 आणि 5 क्रमांक असलेली उत्पादने सर्वात सुरक्षित प्लास्टिक मानली जातात. त्याच वेळी, पुनर्वापर क्रमांक 3, 6 किंवा 7 असलेले प्लास्टिक शक्य तितके टाळणे चांगले आहे. या प्रकारच्या प्लास्टिकचा पुनर्वापर करणे आरोग्यासाठी घातक आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. माणदेश एक्स्प्रेस यातून कोणताही दावा करत नाही. )