पुण्यात नेमकं चाललं तरी काय ? पुण्यातील बिल्डरने शेतकऱ्याला धमकी देत दाखवली बंदुक, पहा व्हायरल व्हिडीओ

0
62

सोशल मीडियावर एका बिल्डरचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. पुण्यातील एक बिल्डर एका शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हर दाखवत धमकी दिली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी गुंड बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपास सुरु केला आणि पोलिसाच्या तपासातून सत्य समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील डीसीपी (झोन 4) विजय मगर यांनी हिंदुस्तान टाईम्सलासांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओत हे रिव्हॉल्व्हर नसून ते लाइटर आहे. रांजणगाव येथील शेतकरी मंगेश शिवाजी पंचमुख यांनी (34) यांनी 3 एप्रिल 2023 रोजी प्रभाकर पांडुरंग भोसले, दीपक राजकुमार पंचमुख, सचिन भालचंद्र पंचमुख आणि किरण अशोक पंचमुख या चार जणांविरुध्द तक्रार दाखल केली. जमिनीच्या व्यवहारातील थकबाकीची मागणी केली असता बांधकाम व्यवसायिक भोसले यांनी रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला.

पोलिस तपासात मंगेशने आपली रांजणगाव येथील जमीन भोसले यांना विकल्याचे समोर आले आहे. विक्रीशी संबंधित सर्व व्यवहार पूर्ण झाले होते. शिवाय, मंगेशने भोसले यांना जमिनीचा इतर व्यवहारात मदत केली होती ज्यासाठी भोसले यांनी मंगेशला 6 लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र, सुरुवातीला 2 लाख रुपये भरल्यानंतर भोसले यांनी प्रलंबित रक्कम देण्यास नकार दिला. मंगेश यांनी भोसले यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही भोसले यांनी ही रक्कम देण्यास नकार दिला.

पहा व्हिडीओ: