आयसीसीने टी-20 विश्वचषकामध्ये यावर्षी विजेता संघांला तब्बल इतक्या कोटीच बक्षीस , उपविजेता संघंही होणार मालामाल

0
8

टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) 2 जूनपासून सुरू झाला आहे. यावेळी स्पर्धेत 20 संघ सहभागी होत आहेत. यावेळी विश्वचषकात संघांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) टी-20 विश्वचषकाची बक्षीस रक्कम (T20 World Cup 2024) जाहीर केली आहे. 2 ते 29 जून दरम्यान होणाऱ्या या मेगा स्पर्धेत आयसीसी कोट्यवधी रुपयांचे वितरण करणार आहे. यावेळी टी-20 विश्वचषक विजेता संघ श्रीमंत असणार आहे. कारण विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेत्या संघाला इतकी बक्षीस रक्कम मिळणार आहे. यावेळी विजेत्या संघाला बक्षीस म्हणून अंदाजे 20.36 कोटी रुपये मिळणार आहेत. आजपर्यंत कोणत्याही विजेत्या संघाला इतकी बक्षीस रक्कम मिळालेली नाही. याशिवाय उपविजेत्या संघाबद्दल बोलायचे झाले तर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला अंदाजे 10.64 कोटी रुपये मिळतील.

आयसीसी विश्वचषकात एवढी रक्कम करणार वितरित

यावेळी आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये अंदाजे 93.51 कोटी रुपये वितरित करणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत जिंकणाऱ्या संघांना पैसे मिळणार आहेत. अशा प्रकारे सर्व संघांना पैसे मिळणार आहेत…

20.36 कोटी रुपये (विजेता)

10.64 कोटी (उपविजेता)

6.54 कोटी रुपये (उपांत्य फेरी)

3.17 कोटी रुपये (दुसऱ्या फेरीतून)

2.05 कोटी रुपये (9वे ते 12वे स्थान)

1.87 कोटी (13 ते 20 ठिकाणी)

25.89 लाख (पहिल्या-दुसऱ्या फेरीत विजय)

20 संघ, 9 मैदाने आणि 55 सामने

यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कप खेळला जात आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी होत असून त्यामध्ये 55 सामने खेळवले जाणार आहेत. 20 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप स्टेजमध्ये एकूण 40 सामने खेळवले जातील. हे सर्व सामने 9 मैदानांवर खेळवले जातील. ज्यामध्ये 3 मैदाने USA आणि 6 मैदाने वेस्ट इंडिजची आहेत.