हातकणंगलेत लोकसभा मतदार संघ ; राजू शेट्टी तिसऱ्या फेरी अखेर तिसऱ्या क्रमांकावर ; तिसऱ्या फेरीत “या” पाटलांची मुसंडी

0
6

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत तिसऱ्या फेरीपर्यंतचे कल हाती आले आहेत. तिसऱ्या फेरीअखेर कधी धैर्यशील माने पुढे तर कधीच सत्यजित पाटील सरूडकर हे आघाडीवर जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांचे टेन्शन वाढले आहे.

तिसऱ्या फेरी अखेर पाटील हे आघाडीवर आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (हे तिसऱ्या स्थानावर आहेत. सकाळी आठ वाजता टपाली मतदानाला सुरुवात झाल्यानंतर खासदार धैर्यशील माने आघाडीवर होते.

ईव्हीएम मधील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत सत्यजित पाटील सरूडकर हे 88 मतांनी आघाडीवर होते. दुसऱ्या फेरी अखेर धैर्यशील माने यांनी जवळपास 800 मतांची आघाडी घेतली. तिसऱ्या फेरी अखेर पुन्हा सत्यजित पाटील सरूडकर यांनी 4463 मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here