
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे आणि त्यामुळे ग्राहकांसाठी हे खरेदीसाठी उत्तम संधीचं क्षण आहे. मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याच्या हालचाली, डॉलरची मजबुती आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे देशभरात सोने काहीशा कमी किमतीत उपलब्ध होत आहे.
सध्याचा दर काय आहे?
ज्वेलरी ब्रँड तनिष्कच्या वेबसाइटनुसार,
24 कॅरेट सोन्याचा दर – ₹97,850 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोन्याचा दर – ₹89,700 प्रति 10 ग्रॅम
एमसीएक्स (MCX) वरील व्यवहारानुसार सोन्याचा भाव सध्या ₹95,475 प्रति 10 ग्रॅम असून, आजचा व्यवहार जवळपास सपाट सुरू आहे (0.01% वाढ).
सोनं आंतरराष्ट्रीय बाजारात सुरुवातीस घसरणीसह उघडलं होतं. मात्र नंतर किंचित स्थिरता आली असून सध्या गोल्डचा भाव 3,280 डॉलर प्रति औंसच्या आसपास आहे. तज्ञांच्या मते, सध्या 3,175 ते 3,325 डॉलर या दरम्यान दर राहू शकतो.
एलकेपी सिक्युरिटीजचे रिसर्च विश्लेषक जतिन त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूराजकीय तणाव कमी झाल्यामुळे आणि गुंतवणूकदारांचा कल बदलल्यामुळे येत्या काही दिवसांत सोनं ₹93,000 ते ₹97,500 प्रति 10 ग्रॅम या दरम्यान राहू शकतं.
वेंचुराचे कमोडिटी प्रमुख एनएस रामास्वामी यांच्या मते, डॉलर निर्देशांकाला फारसा आधार मिळत नसला तरी 9 जुलैच्या टॅरिफ डेडलाइनमध्ये काही बदल झाल्यास किंमतींना आधार मिळू शकतो.
सणासुदीचे दिवस सुरू होण्यापूर्वीच सोनं थोडं स्वस्त झालं आहे. त्यामुळे गृहिणी, नवविवाहित महिला आणि गुंतवणुकीसाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी ही खरेदीसाठी योग्य संधी मानली जात आहे.