दुर्दैवी घटना : सासूरवाडीला जाताना दोन सख्या साडूंचा भीषण अपघातात मृत्यू

0
8

माणदेश एक्सप्रेस न्युज/ छत्रपती संभाजीनगर : शहरातील कन्नड -पिशोर रोडवरील एका पंपासमोर एका भरधाव कारने दुचाकीवरून सासूरवाडीला जाणाऱ्या दोन सख्या साडूंचा चारचाकी गाडीने उडविले. यामध्ये या दोन साडूंचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि. २८) दुपारी साडेचारच्या सुमास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दगडू आबाजी ठाकरे (वय ३२, रा. भादली, ता. वैजापूर) व मुगल विठ्ठल सोनवणे (वय ३८, रा. तांदुळवाडी, ता. कन्नड) हे दोघे सख्खे साडू कन्नड तालुक्यातील गारगोटी तांडा येथे सासुरवाडीला (एम.एच.२० बी. डब्ल्यू ९२१८) दुचाकीवरुन चालले होते. शहरातील पिशोर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ येताच पिशोरहुन कन्नड कडे भरधाव येणाऱ्या (एम.एच.२१ बी. एफ. ५६२९) कारने दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. यात दगडू ठाकरे, मुगल सोनवणे यांचा जागीच मुत्यू झाला.

घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, नागरिकांना त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. शहर पोलीस ठाण्यात कार चालक पंकज करोटे (रा. कन्नड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साडूंच्या दुर्दैवी निधनावर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here