
‘वामा – लढाई सन्मानाची’ या आगामी मराठी चित्रपटाचा जबरदस्त टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटातील ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ हे जबरदस्त आयटम साँग भेटीला आले आहे. या गाण्याने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. डान्सर गौतमी पाटील हिने या गाण्यात आपल्या ठसकेबाज अदांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गौतमी पाटीलचा हॉट अंदाज, वैशाली सामंत यांचा दमदार आवाज व सुचिर कुलकर्णी यांचे कमाल संगीत प्रेक्षकांना थिरकायला लावत आहे. गाण्याचे बोल तरंग वैद्य यांचे आहेत.