ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू

डोंबिवली ते दिवा  दरम्यान गुरुवारी सकाळी एका 37 वर्षीय व्यक्तीचा गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. केवूर सावला (वय, 37) असं या तरुणाचं नाव आहे. केवूर सावला हे मुंबईतील एका कंपनीत सेल्समन असून ते दादर येथील त्यांच्या कार्यालयात जात असताना ही घटना घडली.

डोंबिवलीतील देसलेपाडा येथील नवनीत नगर येथील रहिवासी असलेले सावला त्याचा मित्र बबन शिलकर यांच्यासह सकाळी 9.25 च्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकलमध्ये चढले. पण ट्रेनमध्ये गर्दी असल्याने ते दारात उभे होते. डोंबिवली स्थानकानंतर ट्रेनने वेग घेतला असता, सावरा यांचा तोल गेला आणि ते रुळांवर पडले.

या घटनेत सावला यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर शिलकर यांनी दिवा रेल्वे स्थानकावर धाव घेत यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. मात्र, त्यावेळी एकही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

डोंबिवली ते दिवा दरम्यान गुरुवारी सकाळी एका 37 वर्षीय व्यक्तीचा गर्दीने भरलेल्या ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. केवूर सावला (वय, 37) असं या तरुणाचं नाव आहे. केवूर सावला हे मुंबईतील एका कंपनीत सेल्समन असून ते दादर येथील त्यांच्या कार्यालयात जात असताना ही घटना घडली.

डोंबिवलीतील देसलेपाडा येथील नवनीत नगर येथील रहिवासी असलेले सावला त्याचा मित्र बबन शिलकर यांच्यासह सकाळी 9.25 च्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकलमध्ये चढले. पण ट्रेनमध्ये गर्दी असल्याने ते दारात उभे होते. डोंबिवली स्थानकानंतर ट्रेनने वेग घेतला असता, सावरा यांचा तोल गेला आणि ते रुळांवर पडले.

या घटनेत सावला यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर शिलकर यांनी दिवा रेल्वे स्थानकावर धाव घेत यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. मात्र, त्यावेळी एकही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर, शिलकर यांनी सावरा यांना जीवदानी रुग्णालयात नेण्यासाठी टेम्पोची व्यवस्था केली, जिथे पोहोचल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
ठाणे जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले की, शिलकर यांनी एका घटनेसाठी हेल्पलाइनवर कॉल केला. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे स्थानक व्यवस्थापकाने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली नाही. त्यामुळे शिलकर यांच्यासह इतरांनी टेम्पोची व्यवस्था करून तातडीने सावला यांना रुग्णालयात दाखल केले. या अपघात सावला यांचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button