जयपूर – मुंबई विमानातील टॉयलेटमध्ये धूम्रपान (Smoking) केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील सहार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अर्जून थलोर (34) असं आरोपीचे नाव आहे. तो राजस्थान येथील रहिवासी आहे. 25 मे रोजी अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची जामिनावर सुटका झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसारा, ही घटना २५ मे रोजी विमानमात घडली. जयपूरहून उड्डाण करणाऱ्या एअर इंडियाच्या एआय १५,६७० या विमानातून अर्जून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान अर्जून हे सीट 7 एफ वर बसले होते. त्याने काळी वेळानंतर विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या शौचालयात गेला आणि तेथे धूम्रपान करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे सेन्सर बंद झाला. एका वरिष्ठ क्रू मेंबरने ताबडतोब प्रसाधनगृहात जाऊन दरवाजा ठोठावला आणि बाहेरून तो उघडला.तेव्हा अर्जून धूम्रपान करत असल्याचे दिसला.
विमान मुंबईत उतरल्यानंतर एअर इंडियाच्या सुरक्षा विभागाने अर्जून यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला सहार पोलिस ठाण्यात आणले. सहार पोलिसांनी अर्जूनवर भारतीय दंड संहिता कलम 336 (जीवन धोक्यात आणणारे कृत्य) तसेच विमान कायद्याच्या तरतूदी 25 (विमानात धुम्रपान) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तो जामीनवर सुटला आहे.