आता कोणत्याही वयात पिऊ शकता आवळा ज्युस; त्वचेसोबत ‘या’ समस्यांपासून होतो बचाव

0
49

Amla Juice : भारतीय आयुर्वेदात आवळ्याला अमृत फळ म्हणतात आणि त्याचं कारणही तसंच आहे. आवळा शरीर ताजंतवाना ठेवतो. आजारांशी लढण्याची ताकद देतो आणि एकंदर आरोग्य सुधारण्यास मदत करतो. आवळ्यापासून बनवलेलं आवळा स्क्वॅश हे आरोग्यदायी ज्युस आहे. या स्क्वॅशमध्ये विटॅमिन C, आयर्न, कॅल्शियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. हा ज्युस ताज्या आवळ्याच्या रसापासून बनवला जातो. ज्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. यात कोणताही केमिकल वापरत नाही. हे थंड पाण्यात मिसळून प्यायचं असतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे फायदेशीर आहे.

 

1. रोगप्रतिकारशक्ती वाढवतो
आवळ्यात असलेल्या विटॅमिन C आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुळे शरीराची रोगांशी लढायची ताकद वाढते. सर्दी, खोकला, फ्लू यांसारख्या आजारांपासून बचाव होतो.

 

 

2. पचन सुधारतो
यात भरपूर फायबर असतं, जे पचनसंस्थेसाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे गॅस, अपचन यांसारख्या समस्या दूर होतात.

 

3. त्वचा आणि केसांसाठी वरदान
आवळा ज्युस नियमित प्यायल्याने त्वचा उजळते, सुरकुत्या कमी होतात आणि केस गळण्याचं प्रमाणही कमी होतं. या शिवाय केस मजबूत होतात.

 

4. हृदयासाठी फायदेशीर
हा ज्युस ब्लड प्रेशर नियंत्रित करतं आणि धमन्यांमध्ये ब्लॉकेज होऊ देत नाही. त्यामुळे हृदय निरोगी राहतं.

 

5. डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी उत्तम
विटॅमिन A आणि कॅरोटीन डोळ्यांची दृष्टी सुधारतात. अँटी-ऑक्सिडंट्स मुळे मेंदू शांत राहतो, ताण कमी होतो आणि लक्ष, स्मरणशक्ती वाढते.

 

हा ज्युस आरोग्यदायी असला तरी डायबेटिस असलेल्या व्यक्तींनी ते पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण यात साखर असते, जी ब्लड शुगर वाढवू शकते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here