यशश्री शिंदे खून प्रकरणी आरोपी दाऊदला 7 दिवसांची पोलीस कोठडी

0
213

यशश्री शिंदे खून प्रकरणी आरोपी दाऊदला आज पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याची कलमेही लावण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्येप्रकरणातील आरोपी दाऊद शेख (24) याला काल कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर टेकडी परिसरातून अटक करण्यात आली होती. नवी मुंबईतील क्राइम ब्रॅंच पोलिसांनी आरोपीला अटक केली.

 

यशश्री आणि दाऊद शेख 2019 पासून ओळखत होते. दाऊद शेखला एकदा अटक करण्यात आली होती. पीडितेच्या वडिलांनी दाऊद शेखविरुध्द लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. सुमारे सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला आणि नंतर तो कर्नाटकातील त्याच्या गावी गेला आणि तिथे त्याने बस चालक म्हणून काम केले. प्रेम त्रिकोणामुळे दोघांमधील नात्यात दुरावा निर्माण झाला होता. मुलगी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आली होती आणि त्यामुळे तो चिडला होता.

यशश्री शिंदेच्या हत्यानंतर आरोपी फरार होता. पोलिसांना माहिती मिळताच, आरोपीचा शोध सुरु केला. अखेर मंगळवारी पोलिसांनी त्याला पकडले. कर्नाटकातील शाहपूरा येथून त्याला अटक केले. क्राइम ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॉल रेकॉर्डनुसार, शेख २२ जुलै रोजी उरणाला आला आणि २५ जुलै पासून त्याचा फोन बंद झाला. यशश्री शिंदे हीच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही. त्यामुळे या घटनेचा तपास करत आहे.

 

यशश्रीच्या हत्येपूर्वी दाऊद तिचा पाठलाग करत असल्याचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनास्थळावरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here