ज्येष्ठ मल्याळम अभिनेते आणि असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्टचे सरचिटणीस सिद्दीकी यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अभिनेत्री रेवती संपत हीनं केला आहे. अभिनेत्रीने पुढे सांगितले की, ती २१ वर्षाची असताना तीच्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे. सिद्दीकीने फेसबूकच्या माध्यामांतून माझ्याशी संपर्क साधला.
अभिनेत्री रेवतीने सांगितले की, माझ्यासोबत एक भयंकर घटना घडली. सिद्दीकीने मला फेसबूकवर एक मेसेज पाठवला होता. एका चित्रपटावर चर्चा करण्यासाठी मी त्यांना भेटले. त्यावेळी मी २१ वर्षाची होती. त्यांनी मला लहान मुलगी म्हणून संबोधले आणि मानसिक आणि शारिरिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने माझ्यासोबत जे काही केले, त्यानंतर तो असे वागला की जणू काही घडलेच नाही. या घटनेनंतर माझ्या मानसिक आणि शारिरीक जीवनावर खोलवर परिणाम झाला. इतकेच नाही तर व्यावसायिक जीवनावर देखील परिणाम झाला. मला या विषयी बोलायला बराच वेळ लागला. सिद्दीकी गुन्हेगार आहे.
अभिनेत्रीचा गंभीर आरोप
सिद्दीकीने मल्याळम चित्रपटसृष्टीत ३००हून अधिक चित्रपटात कामे केली. ते एक लोकप्रिय अभिनेते आहे. परंतू सिद्दीकी यांना आता गंभीर आरोपाला सामोरे जावे लागणार आहे. अभिनेत्रीच्या आरोपानंतर त्यांनी मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशन सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.