सीएस प्रोफेशनल प्रोग्राम परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर,कसा पाहाल निकाल?

0
60

भारतीय कंपनी सचिवांच्या संस्थेने (ICSI) जून 2024 साठी सीएस प्रोफेशनल प्रोग्राम परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर  केला आहे. 2 जून ते 9 जून दरम्यान झालेल्या परीक्षेला बसलेले 9, 2024, उमेदवार आता अधिकृत वेबसाइट icsi.edu आणि icsi.examresults.net वरून त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड (ICSI Result Download) करू शकतात. हे निकाल पाहणे आणि डाऊनलोड करुन घेण्यासाठी उमेदवारांनी त्यांचा रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे. निकालाच्या घोषणेबरोबरच, ICSI जून 2024 सत्रासाठी टॉपर्सची यादी (ICSI Toppers) प्रसिद्ध करेल.

ICSI CS टॉपर्स
इशिका सोनीने जून 2024 सत्रासाठी प्रोफेशनल प्रोग्राम (जुना अभ्यासक्रम) परीक्षेत टॉप केले आहे. काजल प्रमोद तिवारीने द्वितीय तर शुभम सुनील चोरडियाने तृतीय क्रमांक पटकावला. प्रोफेशनल प्रोग्राम (नवीन अभ्यासक्रम) परीक्षेच्या बाबतीत, भूमिका सिंगने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यानंतर राज समीर भोजानी आणि हर्षल चंद्रशेखर क्षीरसागर यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर दिया दत्ता आणि पटवर्धन सोनल विजय यांनी जूनच्या परीक्षेत अखिल भारतीय तृतीय क्रमांक पटकावला.

जून 2024 ICSI CS प्रोफेशनल निकाल कसा पाहाल?
अधिकृत वेबसाइटला भेट द्या [icsi.edu](https://www.icsi.edu).
मुख्यपृष्ठावर, ‘CS परिणाम’ टॅबवर क्लिक करा.
‘व्यावसायिक निकाल’ लिंक निवडा.
तुमचा रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
ICSI CS परीक्षेचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
कोठे पाहाल अधिकृत निकाल?
जून 2024 ICSI CS प्रोफेशनल निकालाची थेट लिंक: https://www.icsi.edu (लिंक रिलीज झाल्यावर सक्रिय होते).
निकाल जाहीर झाला, पुढे काय?
ICSI CS एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल डिसेंबर 2024 परीक्षांसाठी नोंदणी उद्या, 26 ऑगस्टपासून सुरू होत आहे. जूनच्या सत्रात पात्र ठरलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे डिसेंबरच्या सत्रासाठी नोंदणी करू शकतात.
एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम परीक्षेच्या गुणांचे विवरण लवकरच ICSI वेबसाइटवर अपलोड केले जाईल. उमेदवारांनी त्यांच्या रेकॉर्डसाठी डिजिटल प्रत डाउनलोड करून जपून ठेवावी लागणार आहे. कारण या निकालाची कागदी प्रत मिळणार नाही.
दरम्यान, ICSI विद्यार्थ्यांना त्यांच्या मूल्यमापन केलेल्या उत्तरपुस्तकांच्या प्रतीची विनंती करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देते. इच्छुक लोक https://cc.icsi.edu द्वारे निकाल जाहीर झाल्यापासून 45 दिवसांच्या आत या सेवेसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी, अधिकृत ICSI वेबसाइटला भेट द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here