जगप्रसिद्ध वेब सीरिज ‘स्क्विड गेम’ चा दुसरा सीजनचा ट्रेलर रिलीज,’या’ तारखेला पाहता येणार नेटफ्लिक्सवर

0
127

‘स्क्विड गेम’ (Squid Game 2) या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोरियन वेब सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्क्वीड गेम 2 चा रोमांचक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. स्क्विड गेम सीझन 1 जगभरात गाजलेल्या वेब सीरिजपैकी एक असून प्रेक्षक याच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता स्क्विड गेम 2 चा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून प्रेक्षकांचा उत्कंठा आणखी वाढली आहे.

गेम थांबणार नाही, तुम्ही तयार आहात का?
ह्वांग डोंग-ह्युक लिखित आणि दिग्दर्शित स्क्विड गेम वेब सीरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच स्क्विड गेम 2 चा स्पेशल ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये म्हटलं आहे. Game Will Not Stop म्हणजेच गेम थांबणार नाही, तुम्ही तयार आहात का? असंही विचारण्यात आलं आहे.

स्क्विड गेम 2 चा ट्रेलर रिलीज
हा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी निर्मात्यांनी या सीरिजचा टीझर शेअर करत नेटकऱ्यांनी या रिलीज डेटदेखील जाहीर केली होती. स्क्विड गेम 2 या नव्या सीझनमध्ये काही नवीन कलाकारदेखील झळकणार आहेत. ‘स्क्विड गेम 2’ नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

या दिवशी सुरु होणार मृत्यूचा खेळ
नेटफ्लिक्सच्या स्क्विड गेम 2 वेब सीरीजच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. स्क्विड गेम सीझन 2 नेटफ्लिक्सवर 26 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. स्क्विड गेमचा पहिला सीझन 2021 मध्ये आला होता. कोरियन ड्रामा स्क्विड गेमच्या पहिल्या सीझनमध्ये कर्जबाजारी लोकांसाठी सहज पैसे कमावण्याचा खेळ दाखवण्यात आला होता आणि या खेळातील कोणत्याची चुकीच्या पाऊलाची शिक्षा मृत्यू होती. कर्जबाजारी लोक पैशासाठी हा खेळ असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

नव्या सीझनमध्ये नवे ट्विस्ट
या खेळातील प्रत्येक टप्पा पूर्ण न करणाऱ्यांना जीव गमवावा लागला, ज्यांनी लेव्हल पूर्ण केले ते लोक पुढच्या फेरीत गेले. अशा प्रकारे, शेवटी एक विजेता राहतो आणि जो खूप मोठी रक्कम जिंकतो. स्क्विड गेम सीझन 2 मध्ये ली जंग-जे, ली ब्युंग-हुन, वाई हा-जून आणि गॉन्ग यू हे कलाकार दिसणार आहेत. आता नव्या सीझनमध्ये नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.

स्क्विड गेम ही 2021 मध्ये प्रदर्शित झालेली नऊ भागांची कोरियन सीरिज आहे. ही त्या वर्षातील सर्वात लोकप्रिय सीरिजपैकी एक होती. सीरीज Netflix वर 94 देशांपैकी टॉप 10 मध्ये होती.

 

पहा ट्रेलर:

 

instagram.com/reel/DAHxJryowR2

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here