विराट कोहली रणजी सामना खेळणार की नाही….

0
57

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील फ्लॉप शोनंतर किंग कोहली देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची तयारी दाखवणार का? हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. रणजी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत २३ जानेवारीला दिल्ली विरुद्ध सौराष्ट्र यांच्यातील लढत रंगणार आहे. या सामन्यासाठी दिल्लीच्या संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत किंग कोहलीच्या नावाचाही समावेश आहे. पण आता तो या सामन्यापासून दूर राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोहली देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासंदर्भातील सस्पेन्स वाढला आहे. कारण त्याची मान दुखावल्याची बातमी समोर येत आहे.

 

 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर भारतीय स्टार खेळाडूंसंदर्भात बीसीसीआयने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यात देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचीही सक्ती करण्यात आली आहे. ही वेळ जवळ आली असताना विराटची मान लचकल्याचे वृत्त समोर येत आहे.