“हा लहानगा नेता होणार”? शाळेतील लहानग्याची हुशारी पाहून नेटकरी थक्क! Video पाहून पोट धरून हसाल, इंटरनेटवर कमेंट्सचा पाऊस

0
233

Childrens Cute Viral Video: सोशल मीडियावर लहानग्यांचे व्हिडीओ पाहताना प्रत्येकाला हसू येतं आणि बालपणाची आठवणही होते. आजची पिढी टॅलेंटनं भरलेली असून त्यांच्या गमतीशीर आणि हुशारीने भरलेल्या क्लिप्स काही क्षणांतच व्हायरल होतात. चिमुकल्यांची निरागस मस्ती, स्मार्टनेस आणि त्यांचे छोटेसे जग पाहणं हे प्रेक्षकांसाठी एक मोठं आकर्षण ठरतं. नुकताच असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही!

 

सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून हसून हसून तुमचंही पोट दुखेल. इंटरनेटवर दररोज शेकडो फोटो, रील्स आणि माहितीजन्य पोस्ट्स अपलोड होत असतात. मात्र, यामधून काही व्हिडीओ इतके मजेदार आणि हटके असतात की ते क्षणार्धात व्हायरल होतात. अशाच एका भन्नाट बालकाच्या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

 

“बालपण देगा देवा’ असे म्हणतात ते उगाच नाही. बालपणीचे दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर आठवणींचा काळ असतो. बालपणी कशाचीही चिंता नाही, फक्त मनसोक्त खेळायचे, बागडायचे आणि मज्जा करायची. आता समोर आलेल्या व्हिडीओत बघा ना, व्हिडीओमध्ये दिसतं की, एक लहान मुलगा उभा राहून काही उत्तर देतो आहे. एवढ्यात दुसरा मुलगा आपली खुर्ची उचलून त्याच्या जवळ येतो आणि बसतो. पण, खुर्ची ठेवताना त्याच्या खाली उभ्या असलेल्या मुलाच्या पायावर ती येते. लगेचच जवळ असलेली शिक्षिका हे पाहते आणि त्या मुलाचा पाय हटवते. पुढे जे होतं, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

 

तीच खुर्ची तो मुलगा तिथेच ठेवतो आणि समोर असलेल्या दुसऱ्या मुलाची खुर्ची उचलून निघून जातो. दुसऱ्या मुलाला याची कल्पनाही नसते आणि तो मागे बसतो… पण खुर्ची नसल्याने थेट जमिनीवर कोसळतो. हे पाहून आजूबाजूचे सगळे हसायला लागतात. विशेष म्हणजे खाली पडलेला मुलगासुद्धा खुद्कन हसतो.

 

एका युजरने लिहिलं, “हा मुलगा मोठेपणी नेता होईल!” दुसऱ्याने लिहिलं, “बालक तर खूपच हुशार निघाला!” तर तिसऱ्याने लिहिलं, “प्लॅन A फसला, पण प्लॅन B यशस्वी झाला!” अशा मजेदार कमेंट्ससह हसणाऱ्या इमोजींनी संपूर्ण पोस्ट भरून गेली आहे.

 

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here