ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेट्रोल भरताना अचानक फोनची रिंग वाजताच बाईक पेटली; पेट्रोल पंप आणि फोनमध्ये किती अंतर असावे

मोबाईल वापरताना काळजी घेतली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये, पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलू नये, या गोष्टींची खबरदारी घेतली गेली नाही तर धोका निर्माण होतो. छत्रपती संभाजीनगर शहरात अशीच एक दुर्घटना घडली. एक दुचाकीस्वार पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला. त्याचवेळी त्याचा मोबाईवर रिंग वाजली. त्यामुळे दुचाकीने पेट घेतली. नशिब चांगले पेट्रोल पंपावर मोठी दुर्घटना घडली नाही.

काय घडला प्रकार
संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील बजाज ऑटो गेट समोरील पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरत होता. त्यावेळी अचानक त्याच्या मोबाईल कॉल आला. त्यामुळे रिंग वाजली. तो पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा होता. त्याचवेळी दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वारांनी व पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लोटत लांब नेली. त्यानंतर तातडीने आग विझवली.

पेट्रोल पंपावर फोनवर का बोलू नाही?
पेट्रोल पंपावर कोणी फोनवर बोलत असले तर त्या ठिकाणी असलेले कर्मचारी लगेच फोन ठेवायला सांगतात. तसेच पेट्रोल पंपावर धुम्रपान करु नका, मोबाईल फोन वापरु नका, अशी चेतावणी देणारी चिन्हीही असतात. पेट्रोल पंपावर मोबाईल न वापरण्यामागे कारण मोबाईलमधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे पेट्रोलची वाफ लागलीच पेट घेते. तसेच जवळच्या धातूच्या वस्तूंमध्ये विद्युतप्रवाह निर्माण करू शकते. यामुळे पेट्रोल पंपावर मोबाईल वापरता येत नाही.

पेट्रोल पंप आणि मोबाईलफोनमध्ये किती अंतर असावे
डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी आणि प्रमोशनकडून पेट्रोल पंप आणि मोबाईलफोनमध्ये किती अंतर असावे? यासंदर्भात सांगण्यात आले आहे. पेट्रोल पंपापासून 6 मीटरचे अंतर ठेऊन मोबाईल वापरावा, असे सांगण्यात आले आहे. पेट्रोल भरुन पेट्रोल पंप सोडल्यानंतर तुम्ही बिनदिक्कत फोन वापरू शकता.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button