
माणदेश एक्सप्रेस न्युज : दिल्ली : एका थार चालकाने पादचाऱ्याला चिरडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या पादचाऱ्याने थार चालकाला हॉर्न जोराने वाजवू नको असे दरडावल्याने त्याचा राग येऊन थार चालकाने त्याच्या दोन्ही पायांवरुन थार नेली आणि घटनास्थळावरुन पलायन केले आहे.
सिक्यरिटी गार्डशी किरकोळ कारणातून झालेल्या वादातून एका वाहन चालकाने त्याची सुव्ह थार त्याच्या अंगावरुन नेल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.या धक्कादायक घटनेत सिक्युरिटी गार्डची अनेक हाडे फॅक्चर झाली आहेत. किरकोळ वादावादीतून वाहन चालक अशा प्रकारे निर्दयीकृत्य करीत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
सिक्युरिटी गार्डने हॉर्न वाजवू नको असे सांगितल्यानंतर झालेल्या किरकोळ वादावादीतून एका सिक्युरिटी गार्डच्या जीवावरच बेतले आहे. या प्रकरणात बिचाऱ्या सिक्युरिटी गार्डची हाडे फॅक्चर झाली आहेत. या दिल्लीतील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महिपलापूर येथील घटनेत दिल्लीचे सिक्युरिटी गार्ड राजीव कुमार त्यांची नाईट शिफ्ट संपवून घरी येत होते. त्यांनी थार चालकाला हॉर्न वाजवू नको असे सांगितले. त्यानंतर थार चालकाशी त्यांची वादावादी झाली अखेर रागाने लालबुंद झालेल्या थार चालकाने त्यांच्या अंगावरुनच ही भारी भरकम सुव्ह नेली.
ही घटना दिल्लीतील महिपलापूर येथे घडली आहे. राजीव कुमार हे सुरक्षा रक्षक रात्रीची शिफ्ट संपवून घरी चालले होते. त्यांना रस्ता ओलांडायचा होता. त्यावेळी एका थार चालकाने त्यांना बाजूला होण्यासाठी सातत्याने हॉर्न वाजवला. त्यानंतर त्यांनी चालकाला हॉर्न जोराने वाजवू नको असे दरडावले, त्याचा राग येऊन थार चालकाने त्यांच्या दोन्ही पायांवरुन थार नेली आणि घटनास्थळावरुन पलायन केले.
दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल येथे काम करणारे राजीव कुमार रात्रपाळी संपवून घरी चालले होते. त्यांना त्यांच्या कारने महिपालपूर चौकात ड्रॉप केले. त्यानंतर ते रस्ता क्रॉस करीत असताना थार चालकाशी त्यांची किरकोळ भांडण झाले. थार चालकाला त्यांनी हॉर्न वाजवू नको असे सांगितल्याने थार चालकाने त्यांच्या अंगावर गाडी टाकली. त्यामुळे ते खाली कोसळले.चालकाने त्यांच्या दोन्ही पायांवरून थार नेली. त्यात त्यांना मल्टी फॅक्चर झाले आहे. ही घटना १९ एप्रिलची आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही तपासून थारच्या चालकाला अटक केली आहे. सिक्युरिटी गार्ड राजीव कुमार हे मुळचे बिहारचे आहेत. तर थार चालक विजय हा दिल्लीच्या रंगपुरीचा रहिवासी आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा