‘व्हॉट्सॲप दररोज रात्री वापरकर्त्यांचा डेटा एक्स्पोर्ट करते’; एलॉन मस्क यांनी व्हॉट्सॲपवर डेटा भंगाचे गंभीर आरोप

0
4

मस्कच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा व्हॉट्सॲपवरील युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. एलॉन मस्क यांनी सांगितले की, चोरीचा डेटा लक्ष्यित जाहिरातींसाठी वापरला जातो. एलॉन मस्कच्या या आरोपावर आतापर्यंत मेटा किंवा व्हॉट्सॲपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

जर तुम्हीही व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. एलॉन मस्क यांनी जगातील सर्वात मोठ्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर मोठा आरोप केला आहे. एलॉन मस्कच्या या विधानाने तंत्रज्ञान जगतात खळबळ उडाली आहे. एलॉन मस्क यांनी व्हॉट्सॲपवर डेटा भंगाचे गंभीर आरोप केले आहेत. एलॉन मस्क यांनी मेटा-मालकीच्या व्हॉट्सॲपबाबत सांगितले आहे की, दररोज रात्री व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचा डेटा एक्स्पोर्ट करते. मस्कच्या या वक्तव्यामुळे लाखो व्हॉट्सॲप यूजर्स चिंतेत पडले आहेत.

एलॉन मस्क यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहे की, ‘व्हॉट्सॲप प्रत्येक रात्री तुमचा यूजर डेटा एक्सपोर्ट करते, मात्र अजूनही काही लोकांना वाटते की गोपनीयतेच्या दृष्टीने आणि सुरक्षिततेच्या बाबतीत व्हॉट्सॲप पूर्णपणे सुरक्षित आहे.’ मस्कच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा व्हॉट्सॲपवरील युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. एलॉन मस्क यांनी सांगितले की, चोरीचा डेटा लक्ष्यित जाहिरातींसाठी वापरला जातो. एलॉन मस्कच्या या आरोपावर आतापर्यंत मेटा किंवा व्हॉट्सॲपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.