निक्कीच्या कानशिलात लगावल्याने आर्याला बिग बॉस कोणती शिक्षा देणार? जेल की घराबाहेर?

0
260

‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात नुकताच पार पडलेल्या कॅप्टनसी टास्कने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. कॅप्टनसी टास्कदरम्यान आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावल्याने घरातील वातावरण एका क्षणात बदलले आहे. निक्कीने आर्याने मला मारलं असल्याचे सांगत बिग बॉसकडे आर्याला शिक्षा देण्याची मागणी केली. आजच्या एपिसोडमध्ये आता बिग बॉस आर्याला कोणती शिक्षा देणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आर्याला जेल होणार की बिग बॉसच्या घराचा नियम मोडल्याने थेट घराबाहेर गच्छंती होणार हे आजच्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल.

काय झालं नेमकं?
नव्या कॅप्टन्सी पदाच्या टास्कदरम्यान जादुई हिरा मिळवण्यासाठी अंकिता, वर्षा ताई, जान्हवी, निक्की आणि आर्या यांच्यात चढाओढ झाली. यात जादुई हिरा मिळवण्याच्या झटापटीत आर्या आणि निक्की यांच्यात जोरात जुंपली. निक्की आणि आर्याच्या या भांडणाचे रूपांतर नंतर झटापटीत आणि त्यानंतर कानशि‍लात लगावण्यापर्यंत गेले. कानशिलात लगावल्यानंतर निक्कीने ‘बिग बॉस’ला सांगितले की, “आर्याने मला मारलंय…मी हे सहन करू शकत नाही”. बिग बॅास यांनी आर्याच्या या कृत्याचा निषेध केला असून यात तिला काय शिक्षा होईल हे आजच्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल.

बिग बॉसने सुनावणार शिक्षा….
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”घरात आर्या आणि निक्की यांच्यामध्ये एक निंदनीय घटना घडली. आर्या यांनी हे निंदनीय कृत्य करुन बिग बॉसच्या मुलभूत नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बिग बॉस आर्या यांना आता शिक्षा ठोठावत आहे”. निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने ‘बिग बॉस’च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बिग बॉस आर्याला काय शिक्षा ठोठावणार? हे जाणून घेण्याची सर्वांनाच आता उत्सुकता आहे. कानशिलात लगावल्यानंतर निक्कीने बिग बॉसला आर्याला घरी पाठवा अशी मागणी केली होती.

जेल की घराबाहेर गच्छंती?
‘बिग बॉस’च्या घरातील नियमांचे उल्लंघन केल्याने सदस्याला थेट घराबाहेर पडावे लागले आहे. याआधीच्या सीझनमध्येही एका स्पर्धकाने महिला स्पर्धकाच्या कानशि‍लात लगावल्याने त्याला घराबाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे आर्याला देखील घराबाहेर काढणार का? की तिला घरातील जेलमध्ये डांबण्यात येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

watch video:

instagram.com/reel/C_1y4muSWTc

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here