काजोलची भूमिका असलेला सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर बघाच

0
204

बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री म्हणजे काजोल. गेल्या अनेक दिवसांपासून काजोलच्या ‘माँ’ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरची चांगलीच चर्चा होती. अखेर नुकतंच ‘माँ’ सिनेमाचा ट्रेलर लाँच मुंबईत पार पडला. ‘शैतान’च्या जगातून असं या ट्रेलरचं वर्णन करण्यात आलंय. २०२४ ला अजय देवगण-आर.माधवनचा ‘शैतान’ सिनेमा रिलीज झाला होता. त्याच धाटणीचा ‘माँ’ सिनेमाचा ट्रेलर पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.

 

‘माँ’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसतं की, काजोल तिच्या मुलीला घेऊन जंगलातील निर्जन वाटेवर प्रवास करते. तिच्या मुलीला त्रास होत असतो. काजोल वेगाने गाडी दामटवत मुलीला धीर देते. इतक्यात त्यांच्या गाडीच्या काचेवर एक मुलीचा मृतदेह आदळतो. त्यामुळे त्यांना धक्का बसतो. पुढे काजोल तिच्या मुलीला घेऊन एका हवेलीत येते. त्या हवेलीत रोनित रॉय आणि इंद्रनील सेनगुप्ता दिसतात. त्या ठिकाणी चालणाऱ्या अनिष्ट प्रथेसाठी मुलींचा बळी दिला जातो, ही गोष्ट काजोलला समजते. पुढे काजोल या वाईट चक्रव्यूहात आणखी गुंतत जाते. तिच्या मुलीवरही संकट येतं.

 

काजोल मुलीला वाचवण्यात यशस्वी होईल का? दुष्ट प्रवृत्तींचा सामना ती करेल का? याची उत्तरं सिनेमा बघूनच कळतील. अजय देवगणने या सिनेमाची निर्मिती केली आहे. काजोलसोबत सिनेमात रोनित रॉय आणि इंद्रनील गुप्ता हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २७ जून रोजी हा सिनेमा भारतातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच हॉरर सिनेमात काजोलला पाहण्यात तिचे चाहते उत्सुक आहेत.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here