सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ पाहा फक्त ९९ रुपयांमध्ये

0
189

सर्वाधिक चर्चेत असलेला ‘झापुक झुपूक’ हा कौटुंबिक मनोरंजन देणारा मराठी चित्रपट २५ एप्रिलपासून थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणने सिनेमातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली आहे. सूरजच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, रीलस्टारचा ‘झापुक झुपूक’ सिनेमा आता ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे. निर्मात्यांनी सूरजच्या प्रेक्षकांसाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक मोठ्या संख्येने या सुवर्ण संधीचा लाभ घेतील.

 

 

केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट येत्या मंगळवारी म्हणजेच २९एप्रिल रोजी प्रेक्षकांना अवघ्या ₹९९ मध्ये थिएटरमध्ये पाहता येणार आहे. तर मग, हसा, धमाल करा आणि तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन ‘झापुक झुपूक’ चित्रपचाटचा फक्त ₹९९ रुपयांमध्ये आनंद घ्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here