‘टीम इंडियाला 11 कोटी देण्याची गरज होती का? विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

0
51

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटींचं बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. विधान भवनाच्या सेंट्र्ल हॉलमध्ये मुंबईच्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी 11 कोटींच्या बक्षिसाची मोठी घोषणा केली. याआधी बीसीसीआयने टीम इंडियाला 125 कोटी रुपयांच्या धनादेश दिला. यावरुन आता राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे.

विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना 11 कोटी रुपये देण्याची गरज नव्हती असं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे. “टीम इंडियाला आता 11 कोटी रुपये देण्याची गरज होती का? खेळाडू देशासाठी खेळतात. 120 कोटी रुपये बीसीसीआयने दिल आहेत. एवढी मोठी रक्कम इनाम म्हणून दिल्यावर स्वत:च्या तिजोरीतून पैसे द्यायची काय गरज होती?” असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला.

पहा व्हिडीओ: