विनेश फोगटने सलग तीन सामने जिंकत अंतिम फेरीत धडक ! भारतासाठी पदक केले निश्चित

0
117

 

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला. या सामन्यात विनेश फोगटने 5-0 असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर तिने भारताचे सुवर्ण किंवा रौप्य पदक निश्चित करत अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनण्याचा मान विनेशने पटकावला आहे.

पहिल्या फेरीत विनेश फोगटने क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझला एकही संधी दिली नाही. क्युबाच्या लोपेझने विनेश फोगटच्या पायांवर सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. विनेश फोगटने सलग दोन गुण घेत सामन्यात 5-0 अशी आघाडी घेतली. सामन्याच्या अखेरीस युस्नेलिस गुझमन लोपेझने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु विनेश फोगटने तिला कोणतीही संधी दिली नाही . आपल्या आक्रमक खेळावर विश्वास दाखवत विनेशने खेळात आक्रमकता टिकवून ठेवत शानदार एकतर्फी विजय प्राप्त केला आहे.

आजचा दिवस विनेश फोगाटने गाजवला. आज तीने सलग तीन सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. विनेश फोगटने उपांत्यपूर्व फेरीत उत्कंठावर्धक लढतीत युक्रेनच्या ओसाना लिवाचचा 7-5 असा पराभव केला. याशिवाय पहिल्या सामन्यात तिने जपानच्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव केला. चार वेळा विश्वविजेत्या सुसाकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here