
Viral video : जंगलात जिवंत राहणं सोपं काम नाही. कारण कधी कुठून हल्ला होईल सांगता येत नाही. अगदी पाणी पिताना सुद्धा सावध राहावं लागतं. कारण शिकारी पाण्यात सुद्धा दबा धरून बसलेले असतात. जंगली प्राण्यांच्या झुंजीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जंगलात त्याच प्राण्यांची चालते, त्यांच्यामध्ये बळ किंवा शक्ती असते. इतर कमी ताकदीचे प्राणी मोठ्या किंवा शक्तीशाली प्राण्यांना बळी पडतात.
‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात; तर काही व्हिडीओ मजेदार असतात. त्यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. यात हत्तीच्या एका कळपाने चिमुकल्या झेब्राच्या पिल्लावर हल्ला करत त्याला पायदळी तुडवल्याचे दिसून आले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक झेब्रा एकटाच गवत चरत असल्याचे दिसत आहे. यावेळी अचानक हत्तींचा एक कळप त्याच्याकडे येतो. सुरुवातीला असे दिसते की हत्ती त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अचानक एक मोठा हत्ती झेब्रावर हल्ला चढवतो आणि इतर हत्तीही त्याच्या मागे जातात. झेब्रा त्याचा जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करतो. हे दृश्य इतके भयानक वाटते की ते पाहून पाहणाऱ्यांचा श्वास रोखला जातो. दरम्यान हा व्हिडिओ नक्की कुठला आहे ते मात्र अद्याप कळू शकले नाही मात्र यातील दृश्ये लोकांचा थरकाप उडवत आहेत हे नक्की.
— Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) April 28, 2025