मध आणि मुलायम साय यांचा असा करा वापर, चेहरा होईल चमकदार

0
43

skin care tip : आपल्यापैकी प्रत्येकालाच चेहरा चमकदार हवा असतो. यासाठी बहुतेकजण त्वचा चमकदार ठेवण्यासाठी स्किन केअर असणारे प्रोडक्ट वापरतात. त्याच वेळी काही लोकं त्यांची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार व्हावी यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करतात. घरगुती उपाय देखील बरेच प्रभावी मानले जातात. कोरफडीसारख्या वनस्पती किंवा स्वयंपाकघरात असलेल्या हळदीसारख्या गोष्टी ज्या औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात त्यांचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. अशातच मध आणि साय देखील त्यापैकी एक आहे.

 

मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. हे त्वचेला हायड्रेट करण्यास आणि ओलावा टिकवून ठेवण्यास देखील मदत करते. तर दुधावरील साय ही त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि मऊ बनवण्यास देखील मदत करते. त्यामुळे तुम्ही ते अनेक प्रकारे वापरू शकता. जेणेकरून तुम्हाला नैसर्गिकरित्या चमकणारी त्वचा मिळेल.

 

चेहऱ्यावर साय लावणे देखील फायदेशीर आहे, विशेषतः ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी मध आणि साय हे फार उपयुक्त आहे. मध आणि साय लावल्याने त्वचेमधील ओलावा टिकून राहते. याशिवाय टॅनिंग देखील कमी करता येते. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला सनटॅन आणि सनबर्नच्या समस्येपासून वाचवण्यास मदत करतात. तसेच त्वचेवरील घाण काढून टाकण्यास मदत होते. चेहऱ्यावर साय लावल्याने चेहऱ्यावरील कोरडेपणामुळे होणाऱ्या जळजळीपासून आराम मिळतो.

 

मध आणि साय
एक चमचा मध आणि एक चमचा ताजी साय घ्या आणि एका भांड्यात चांगले मिक्स करून त्याची मऊ पेस्ट बनवा. हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावल्यानंतर, पाण्याने स्वच्छ धुवा. डोळ्यांभोवतीचा भाग वगळता, संपूर्ण चेहरा आणि मानेला हलक्या हातांनी मसाज करण्याचे लक्षात ठेवा.

 

साय आणि हळद
साय आणि हळद दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहेत. हा फेस पॅक लावल्याने तूमच्या चेहऱ्यावर चांगले परिणाम दिसून येतील. तर साय आणि हळद यांचा फेसपॅक बनवण्यासाठी 2 टेबलस्पून साय, 1 टीस्पून मध आणि 1 टीस्पून हळद पावडर घ्या. या तिन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि मऊ पेस्ट बनवा. 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर, कोमट किंवा सामान्य पाण्याने चेहरा धुवा. ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे त्यांच्यासाठी हे अधिक योग्य असेल.

 

साय, मध आणि कोरफड
2 टेबलस्पून क्रीम, 1 टीस्पून मध आणि 1 टेबलस्पून कोरफड जेल मिक्स करून मऊ पेस्ट बनवा. त्यात हे फेसपॅक 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर चेहरा धुवा. हा फेस पॅक त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करू शकतो.

 

( डिस्क्लेमर : यामध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here