दुर्देवी घटना : पोलीस भरतीवेळी धावताना चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू

0
95

माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे : राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीत उमेदवारांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागत असते.

परंतु मैदानी चाचणी दरम्यान, पुणे येथे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ⁠तुषार बबन भालके (वय २७), असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पोलीस भरतीसाठी शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर मैदानी चाचणी सुरू आहे. याचसाठी तुषार बबन भालके हा तरुणही येथे आला होता.

 

यावेळी मैदानी चाचणीदरम्यान धावताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here