अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 3 वर्षाच्या मुलाला शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना पिंजर येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनामुळे गावात एकच हळहळ व्यक्त केली जाते. अकोल्यात सात दिवसांत तीन मुलांनी जीव गमावला आहे. मे महिन्यांत देखील अश्याच घटना घडल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील पिंजर गावातील 3 वर्षाच्या मुलाला कुलरचा शॉक लागला. शॉक लागल्याने त्याच्या पोटात दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. गावातीला नागरिकांनी हळहळ व्यक्त केले आहे. विरांश रवी राजगुरे असं मुलाचे नाव होते. विरांशच्या पालकांनी सांगितले की, तो कुलर जवळ खेळत होता. अचानक कुलरचा शॉक लागला. त्याला डॉक्टरांकडे आणले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत सांगतिले.
गेल्या अनेक दिवसांपासून अकोल्यात अश्याच काही घटना घडत आहे. सात दिवसांपूर्वी अकोट जिल्ह्यात काळेगावातील दोन मावश बहिणी कुलर जवळ खेळतअसताना अचानक दोन्हींनी कुलराला हात लावला. कुलरला हात लावताच त्यांना जोरात शॉक लागला. शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. मे महिन्यात कुलरमध्ये पाणी भरताना, पोलिस हवालदार यांना शॉक लागला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मळसुर गावातील नितीन गजानन वानखेडे यांचा देखील कुलरच्या शॉकमुळे मृत्यू झाला.