अंडरवल्ड डॉन छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा, सीबीआय कोर्टाचा निर्णय

0
5

मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई विशेष न्यायालयाने आज गुरुवारी अंडरवल्ड डॉन छोटा राजनला दोषी ठरवले आहे. 2001 मध्ये मुंबईतील ग्रँट रोड येथे जया शेट्टी यांच्यावर छोटा राजनच्या गुंडांनी गोळ्या झाडल्या होत्या. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत खटल्यांसाठी विशेष न्यायाधीश ए.एम. पाटील यांनी राजनवर ठपका ठेवला आहे.

जया शेट्टी या मध्य मुंबईतील गावदेवी येथील गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालक होत्या. त्यांना छोटा राजन टोळीकडून खंडणीची मागणी होत होती. या प्रकरणी जया शेट्टी यांनी पोलिसांकडून सुरक्षा मागितली होती. मुंबई पोलिसांनी त्यांना सुरक्षाीह दिली होती. मात्र, हत्येच्या दोन महिन्यांपूर्वी त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. 4 मे 2001 रोजी, जया शेट्टी यांच्या हॉटेलमध्ये गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली.