Ujani Dam Boat Accident : उजनीतील आजच्या दिवसाचं शोधकार्य थांबवले ; सहा जण अद्यापही बेपत्ता ; बोट सापडली ; धरणात बुडालेल्या सहा जणांची नावे समोर

0
13

उजनी धरणात काल बोट बुडाल्याची दुर्देवी घटना घडली होती. धरण पात्रात वादळी वारे आणि ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शोधकार्यात अडथळे येत असल्याने व अंधार पडल्यामुळे NDRF च्या पथकाने आजच्या दिवसाचं शोधकार्य थांबवले असले तरी पथकाला बोट सापडली आहे. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा सुरु शोधकार्य होणार आहे.

 

उजनी धरणात बोट बुडाल्याने या बोटीतील 6 जणांचा शोध अद्याप घेतला जात आहे. करमाळा आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवर ही दुर्घटना घडली आहे. पाणबुडीला पाण्यात मोटारसायकल सापडल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोटारसायकल पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. या बोटीतून प्रवास करणाऱ्या सहाजणांचा शोध अद्याप सुरु आहे. बुडालेली बोट बाहेर ओढून काढण्यात येत होती. मात्र ही बोट गाळात अडकल्याने बोट बाहेर काढण्याची प्रक्रिया सध्या थांबवली.

पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे समोर
या दुर्घटनेत बुडालेल्या प्रवाशांची नावे समोर आली आहेत. गोकुळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल दत्तात्रय जाधव (वय 25) शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय 3) (सर्व रा.झरे ता.करमाळा), अनुराग अवघडे (वय 35) गौरव धनंजय डोंगरे (वय 16 दोघे रा.कुगाव ता.करमाळा) अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत.