दोन एसटी बसची एकमेकांना धडक होऊन भीषण अपघात, अनेक प्रवाशी जखमी

0
100

रायगड येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन एसटी बसची समोरासमोर एकमेकांना धडक लागली. धडकेत दोन्ही बसमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. दोन्ही बसमधील चालक गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग आणि रेवदंडा मार्गावर हा अपघात झाला. नवेदर बेली येथील वळणावर दोन्ही बसची एकमेकांना धडक लागली. हा बस अपघात इतका भीषण होता की,दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले आहे. दोन्ही बसमधील प्रवाशी जखमी झाले. दोन्ही 15 ते 20 प्रवाशी प्रवास करत होते. अपघातात दोन्ही बसचे समोरील भागाचे नुकसान झाले.

अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमी आणि अपघातात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शासकिय रुग्णालयात सर्वांवर उपचार सुरु करण्यात आले आहे. अपघातात दोन्ही बसचे भरपूर नुकसान झाले आहेत. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी देखील झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेल्याची माहिती नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here