बाजारात मंगळवार ठरला ‘अमंगल’! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी घसरण, पण काही शेअर्सनी दिली दिलासा

0
63

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : आठवड्याच्या दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात, मंगळवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली. सुरुवातीला थोडीशी स्थिर वाटणारी बाजाराची स्थिती शेवटच्या सत्रात पूर्णतः उलटली. जागतिक बाजारातील अस्थिर संकेत, विक्रीचा दबाव आणि ब्लॉक डील्समुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता वाढली.

 

मंगळवारी सेन्सेक्स ६३६ अंकांनी घसरून ८०,७३८ वर बंद झाला, तर निफ्टी १७४ अंकांनी घसरून २४,५४३ या पातळीवर बंद झाला. निफ्टी बँकही ३०३ अंकांनी घसरून ५५,६०० वर स्थिरावला. मिडकॅप व स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी कमजोरी दिसून आली.

 

घसरणीचे मुख्य कारणे:
जागतिक अस्थिरता: विदेशी बाजारातून आलेल्या नकारात्मक संकेतांचा परिणाम भारतावर झाला.

ब्लॉक डील्सचा परिणाम: येस बँक १०% आणि ओला इलेक्ट्रिक ८% नी घसरले.

जीवन विमा कंपन्या: विक्री आकडे अपेक्षेपेक्षा कमी येण्याच्या शक्यतेने १ ते ३% नी घसरण.

व्होडाफोन आयडिया: सलग घसरण कायम, आज ४% नी घसरला.

तेल व पेंट कंपन्या: आंतरराष्ट्रीय क्रूड तेल दरातील चढ-उताराचा परिणाम.

 

काही शेअर्सने दिला दिलासा:

खत कंपन्या: लवकर आलेल्या मान्सूनमुळे शेअर्समध्ये तेजी.

शिपयार्ड कंपन्या: कोचीन शिपयार्ड आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स ६% नी वाढले.

रिअल्टी क्षेत्र: व्याजदर कपातीच्या अपेक्षेने खरेदी वाढली.

भांडवली बाजार कंपन्या: बीएसई आणि एमसीएक्सने जोरदार कामगिरी केली.

हिंदुस्तान झिंक: मिडकॅप शेअरमध्ये सर्वात वेगाने वाढ.

 

मंगळवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी ‘अमंगल’ ठरला असला, तरी काही निवडक क्षेत्रातील शेअर्सनी बाजाराला आधार दिला. गुंतवणूकदारांनी सतर्क राहून, निवडक खरेदीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here