इचलकरंजी येथील कृष्णा नदी ओलांडताना ट्रॅक्टर पाण्यात उलटला, सहा जण बेपत्ता

0
496

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. सद्या पावसाचा प्रमाण कमी झाले असले तरी अधूनमधून दमदार पाऊस सुरुच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांनाही पूर आला आहे. सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी नागरिक आपला जीव धोक्यात घालत आहेत. इचलकरंजी येथील कृष्णा नदी ओलांडताना एका ट्रॅक्टरसोबत असाच प्रकार घडला. चालकाने तुडुंब भरलेल्या नदीच्या पाण्यातून ट्रॅक्टर पलिकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाल्याने ट्रॅक्टर पाण्यात उलटला. या घटनेत सहा जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.

एक्स पोस्ट: