मेष: या राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभदायी राहणार आहे. व्यापार करणारे आज संध्याकाळपर्यंत मोठी डील करतील. आज कार्यक्षेत्रात विशेष लाभ आणि सन्मान मिळणार आहे. कुटुंबासोबत लग्न सोहळ्याला जाल. सामाजिक क्षेत्रात तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. जुन्या गोष्टींमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग आहे. मात्र, गरज नसेल तर प्रवास करू नका.
वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. आज एकाद्या राजकीय आंदोलनात भाग घ्याल. ऑफिसचं वातावरण तुमच्या बाजूने राहील. सहकाऱ्यांचं कामात सहकार्य मिळेल. उद्योग व्यवसाय करणारे लोक आज नव्या योजनेवर काम करू शकतात. भविष्यात या योजनेचा फायदाच होणार आहे. एखादं कायदेशीर प्रकरण चालू असेल तर त्यात फायदा होईल. आज संध्याकाळपर्यंत सर्व कटकटीतून मुक्तता होईल. आज तुम्हाला खूप हलकं हलकं वाटेल. आज प्रेयसीसोबत वेळ घालवाल.
मिथुन: आजचा दिवस व्यस्तेत जाईल. तुम्हाला उद्योगातील सर्व प्रलंबित कामे आज मार्गी लावावे लागतील. एखाद्या घरगुती जबाबदारीमुळे प्रवासाचा योग आहे. नोकरदारांना आवडीचं काम करायला मिळेल. सर्व कार्यात कुटुंबातील लोकांची साथ मिळेल. लव्ह लाईफमध्ये पार्टनरसोबत आज फिरायला जाल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नशेपासून दूर राहा. गावाकडे जाण्याचा योग आहे. एखाद्या खोट्या प्रकरणात तुमचं नाव घेतलं जाईल.
कर्क: आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कार्यक्षेत्रात रोचक आणि रचनात्मक काम करायला मिळेल. तुमचा आत्मविश्वास आणि दरारा एवढा वाढेल की तुमचे शत्रू तुमचं काहीच करू शकणार नाहीत. तुमची सर्व कामे आज मार्गी लागतील. तुम्हाला प्रत्येक कामात यश येईल. आज तुम्ही व्यवसाय वाढवण्याची योजना आखाल. कुटुंबात जीवनसाथीची भरपूर साथ मिळेल. प्रेमात आश्वासक गोष्टी घडतील. संध्याकाळी मित्रांसोबत वेळ घालवाल. सिनेमाला जाण्याचा योग आहे.
सिंह: आजचा दिवस तुमचा व्यस्ततेत जाईल. त्यामुळे प्रचंड थकवा जाणवेल. तरीही तुम्ही कुटुंबासाठी चांगला वेळ द्याल. त्यामुळे कुटुंबातील सर्वचजण खूश होतील. तुम्ही तुमच्या लव्ह लाइफला आज चांगल्या प्रकारे मॅनेज कराल. त्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. दूरचे नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. अविवाहितांच्या विवाहात अडथळे येतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी बसेल. अचानक एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी परदेशी जाण्याचा योग आहे. घरातील कलह दूर होतील. कोर्ट कचेरीच्या प्रकरणातून मुक्त व्हाल.
कन्या: तुमच्या लग्नाची बोलणी सुरू असेल तर आज तुमचं लग्न पक्कं होण्याची शक्यता आहे. वडिलांच्या सल्ल्याने एखाद्या समस्येतून मार्ग काढाल. कुणालाही उधार देऊ नका. उधार दिल्यावर पैसे परत येण्याची शक्यता फार कमी आहे. आज तुमचा खर्च वाढण्याची शक्यता अधिक आहे. व्यसनापासून दूर राहा. गावाकडे शेतीची कामे मार्गी लागतील. शहरातील नोकरदारांना गावाकडे जावं लागणार आहे. गावाकडे कोंबड्या चोरीला जातील. उद्योगात रिकामटेकड्या लोकांचा सल्ला घेऊ नका.
तुळ: अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांचा पगार वाढण्याची शक्यता आहे. काहींना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत तुमच्यावर नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे. जीवनसाथीचं पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमची एखादी इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात दीर्घकाळापासून सुरू असलेला तणाव दूर होईल. एखादी दु:खद बातमी ऐकायला येऊ शकते. कानाची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जीवनसाथीसाठी एखादी भेट वस्तू खरेदी कराल. तुमच्या वाढदिवसानिमित्ताने आज तुम्हाला भरपूर गिफ्ट्स मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: आजचा दिवस उत्साहवर्धक राहणार आहे. आर्थिक प्रकरणात तुम्हाला आज लाभ होणार आहे. तुमच्या एखाद्या समस्येवर आज तोडगा निघेल. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता ती आज तुमच्याशी संवाद साधेल. गृहिणींसाठी आजचा दिवस कटकटीचा जाईल. नोकरदार महिलांना आज पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. दिवसभर काम केल्याने संध्याकाळी प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतील. घरातील महत्त्वाच्या गोष्टींसाठी आज खरेदी कराल.
धनु: तुमच्या कार्यक्षेत्रात आज तुम्हाला यश मिळेल. तुमच्या विरोधकांचं षडयंत्र अयशस्वी होईल. आर्थिक लाभासाठी आज तुम्ही एक जोखमीचा निर्णय घेऊ शकता. तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीने केलेल्या मदतीचा तुम्हाला फायदा होणार आहे. व्यवसायाच्या नव्या संधी मिळतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आज नोकरी मिळेल. वैवाहिक जीवनात जीवनसाथीसोबतचे संबंध सुमधूर होतील. परदेशातून एखादा फोन येण्याची शक्यता आहे. आजचा दिवस अत्यंत प्रसन्न असा जाईल. तुमच्या एकतर्फी प्रेमाला समोरून प्रतिसाद मिळेल.
मकर: जीवनसाथीच्या भावना समजू घ्या. नाही तर नाराजीचा सामना करावा लागेल. तुम्ही आज भागिदारीत काही काम करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमच्यावर आज अनेकप्रकारचे दबाव येतील. नको त्या वादात पडू नका. शेजाऱ्याच्या नादी लागू नका. सोसायटीतील वादापासून दूर राहा. घर घेण्याचा योग आहे. एखादे वाहन खरेदीचा योग आहे. आर्थिक गुंतवणूक करताना चार लोकांचा सल्ला घ्या. अति रिस्क घेऊ नका.
कुंभ: तुम्हाला आज व्यवसायात लाभ होणार आहे. पण तुमच्या प्रकृतीवरही आज परिणाम होणार आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. आज तुम्हाला लाभाच्या नव्या संधी मिळतील. जे लोक परदेशात जाण्याचा बेत आखत आहेत, त्यांचा बेत यशस्वी होईल. सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक क्षेत्रात कार्यरत राहाल. छोट्या उद्योजकांना आज मोठी डील मिळेल. चार पैसे खिशात आल्यानंतर त्याची उधळपट्टी करू नका. जवळच्या हिल स्टेशनला फिरायला जाण्याची शक्यता आहे. पाण्यापासून दूर राहा.
मीन: तुमचं कौटुंबिक जीवन अत्यंत चांगलं राहील. भावांचं सहकार्य मिळेल. घरी बहिणीचं आगमन होईल. गावाला जाण्याचा योग आहे. लग्नाळूंना आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीसाठी केलेला प्रयत्न आज कामाला येईल. एखाद्या सामाजिक कार्यात भाग घ्याल. ट्रेनचा प्रवास महागात पडेल. जवळच्या नातेवाईकांची भेट होईल. अचानक धनलाभाचा योग आहे. मोठी खरेदी करणं टाळा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)