पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा रेडिओ प्रोग्राम 3 महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा सुरू होत आहे. तिसर्यां दा देशाच्या पंतप्रधान पदाची स्वीकारल्यानंतर आज पुन्हा ते देशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’ चं प्रक्षेपण केलं जातं. या कार्यक्रमांमध्ये जनतेलाही सहभागी करून घेतलं जात त्यासाठी MyGov Open Forum, NaMo App वर लोकांना मेसेज देण्याचं आवाहन केलं जातं तर 1800 11 7800वर देखील मेसेज दिला जातो.
‘मन की बात’ चा शेवटचा एपिसोड 25 फेब्रुवारी दिवशी प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर देशात लागलेल्या 18व्या लोकसभा निवडणूकीसाठीच्या आचारसंहितेमुळे ‘मन की बात’ थांबवण्यात आला होता. आज या शो चा 111 वा एपिसोड जारी केला जाईल. त्यांच्या 110 व्या एपिसोडमध्ये, मोदींनी प्रथमच मतदारांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले होते आणि त्यांचे पहिले मत देशासाठी असावे असे सांगितले होते.
आपल्या शेवटच्या भाषणात मोदींनी महिला सक्षमीकरणाविषयी सांगितले आणि सांगितले की भारताची नारी शक्ती प्रत्येक क्षेत्रात प्रगतीच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे. त्यांनी NAMO ड्रोन दीदी योजनेचाही उल्लेख केला जी महिलांना त्यांच्या स्थानिक शेती पुरवठा साखळीतील अविभाज्य भागधारक बनण्यास मदत करण्यासाठी केंद्राने सुरू केली होती.
मन की बात एपिसोड 111 थेट प्रक्षेपण
तिसर्यां दी पंतप्रधान झाल्यानंतर अशा कार्यक्रमातून जाहीरपणे मोदी पहिल्यांदाच बोलणार आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितल्यानुसार पहिल्या 100 दिवसांचा कार्यक्रम त्यांच्याकडे तयार होता. आता या पहिल्या 100 दिवसांच्या काळात ते कोणती कामं करणार? शेतकरी, महिला, तरूण यांच्यासमोरील समस्यांबद्दल ते काही बोलणार का? याकडे सार्यांेचे लक्ष लागले आहे.